Akola crime: murder case: माधवनगर मध्ये भर संध्याकाळी घडले हत्याकांड: भावाने केली बहिणीची हत्या; हेडफोन वरून झाला वाद!

Massacre in Madhavnagar in the evening: Brother kills sister;  Dispute over headphones!




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : तुकाराम चौक जवळ असलेल्या माधव नगर येथे आज संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान बहीण भावात हेडफोन वरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. यातच भावाने बहिणीवर धारधार शस्त्राने वार करून कायमचे संपविले असल्याची घटना घडली. सध्या आरोपीला खदान पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली .  



नात्याने हे सख्खे बहीण भाऊ नसून मामे भाऊ आते बहीण आहेत. मामे भावाने आपल्या आते बहिणीची  ६ वाजताच्या सुमारास घरातच धारदार शस्त्राने हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच खदान पोलिस घटनास्थळी पोहचले. तसेच बघेकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे.



पोलिसांनी मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता मात्र,पोलिसांनी लगेच शोध घेवून त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमागे संशय कारणीभूत असल्याची चर्चा आहे. तसेच हेडफोन देण्या घेण्या वरून बहीण भावात भांडण झाले. त्यातून हे हत्याकांड घडले, अशी देखील चर्चा परिसरात सुरू आहे. 




विशेष म्हणजे घटनेच्यावेळी घरातील महिला घरात हजर होत्या. तुकारामचौक जवळील जयभोले सुपर शाॅपी समोर असलेल्या माधव नगर परिसरात प्रकाश यादव आणि त्यांचे कुटुंब व त्याचे बहिण जावाई नंदलाल यादव व त्यांचे कुटुंब एकात्रित जागेत मात्र वेगवेगळे राहतात.



दुपारी ६ वाजताच्या सुमारास घराच्या मागे असलेल्या स्नानघर जवळ नंदलाल यादव यांची मुलगी नेहा (वय अंदाजे १९) ही उभी असताना, प्रकाश यादव यांचा मुलगा बबलु (वय अंदाजे २१) याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. क्षणातच ती रक्ताच्या थारोळ्यात पडली तर बबलु फरार झाला होता. काही क्षणातच ही घटना परिसरात कळताच  एकच खळबळ उडाली.खदान पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठले. वृत्त लिहिस्तोवर घटने मागील ठोस कारण समोर आलेले नाही.




टिप्पण्या