Road construction: न्यू जोगळेकर प्लॉट मधील रस्ता बांधकामाचा शौकत अली मिरसाहेब यांच्या हस्ते आरंभ






अकोला:  महानगर पालिका प्रभाग क्रमांक 9 मधील न्यू जोगळेकर प्लॉट मध्ये 6 लाख रु निधी खर्चून निर्माण करण्यात येत असलेल्या रस्ता बांधकामाचा आरंभ अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  शौकत अली मिरसाहेब यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. मनपा नगर सेवक मोहम्मद मुस्तफा यांनी मनपा कडून मंजूर केलेल्या विकास निधी अंतर्गत या रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. 



प्राथमिक सुविधांची गरज-मिरसाहेब


मनपाने प्रभाग मधील नागरिकांना रस्ते, आरोग्य, पाणी, वीज, शिक्षण या प्राथमिक सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी नगर सेवक मोहम्मद मुस्तफा सतत प्रयत्न करीत असल्याबद्दल मिरसाहेब यांनी त्यांच्या कौतूकास्पद कामगिरीचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. 54 मीटर या रस्त्याचे बांधकाम शिघ्र दर्जेदार काम करून पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 




6 लाख 80 हजार रु निधी मंजूर


न्यू जोगळेकर प्लॉट मधील या रस्त्याचे बान्धकामा साठी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी यापूर्वी 15 लाख रु व आमदार गोवर्धन शर्मा यांनी 5 लाख रु विकास निधी दिला होता. परंतु केवळ 54 मिटर लांबीचे बांधकाम अपूर्ण राहिले होते. नगरसेवक मो. मुस्तफा यांनी या अपूर्ण कामा साठी मनपा कडून 6 लाख 80 हजार रु निधी मंजूर करून घेतल्या मुळे आता या अपूर्ण रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन नगर सेवक मो मुस्तफा यांनी यावेळी दिले.




याप्रसंगी एम आय एम चे महानगर अध्यक्ष मुनाफ भाई, मो इलियास खान, अ रेहमान बाबू , जावेद  खान, कृषी व्यवसायी शेख साहेब, मो निसार, मो अतिक, मो नफिस, राजिक भाई, अशरफ अली, मो जुनेद, मो शोएब, मो जावेद , मो अब्बास , देशमुख , व परिसरातील नागरिक व एम आय एम चे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या