Nagpur:Murder: उपराजधानी हादरली: एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या; हत्याकांड नंतर आरोपीची आत्महत्या

                                       file photo




नागपुर: एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याची घटना पाचपावली परिसरात उघडीस आल्याने उपराजधानी हादरून गेली आहे. हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु केला. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. एवढ्या वरच तो थांबला नाही. यानंतर तिथेच थोड्या अंतरावर असणाऱ्या सासरवाडीला जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा आपल्या घरी आला आणि गळफास घेत जीवनयात्रा संपविली.



रविवारी रात्री हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. या घटनेने उपराजधानी हादरून गेली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


टिप्पण्या