- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुंबई: कुवेत आणि कतार या देशांतून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन भरलेले 7,640 सिलेंडर्स, प्रत्येकी 20 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन असलेले 2 आयएसओ कंटेनर्स, आणि 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घेऊन आलेले भारतीय नौदलाचे शार्दुल नामक जहाज आज 24 जून रोजी मुंबई बंदरात दाखल झाले.
कोविड-19 महामारीशी लढा
आखाती देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन देशात वाहून आणण्यासाठी या जहाजाची नेमणूक करण्यात आली आहे. कोविड-19 महामारीशी लढा देण्याच्या देशाच्या प्रयत्नांना पाठींबा देण्यासाठी भारतीय नौदलाने सुरु केलेल्या समुद्र सेतू II मोहिमेचा भाग म्हणून ही नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा