Touktae cyclon: Akola: तोक्ते चक्रीवादळाची झळ अकोल्यातही; सोसाट्याच्या वादळ पावसात शेतीचे नुकसान, 3 जखमी, विशाल वृक्ष उन्मळून पडली, विद्युत पुरवठा खंडित

                           photo:koshataki





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : तोक्ते चक्रीवादळाची झळ अकोल्यातही पोहचली असून, आज सायंकाळी झालेल्या सोसाट्याच्या वादळ व पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी मोठी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. 



दरम्यान, जुने शहरात 3 व्यक्ती जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गांधी रोड, जुना आळशी प्लॉट येथील पिंपळाचे विशाल वृक्ष उन्मळून पडले. यात कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान विद्युत खांब क्षती ग्रस्त झाल्याने शहरातील अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.



दरम्यान रविवारी झालेल्या सोसाट्याच्या वादळ वाऱ्यात अनेक घरांची छपरे उडून गेली होती. शहरी व ग्रामीण भागात प्रचंड नुकसान झाले.तर आज झालेल्या वादळ व पावसामुळे  जनजीवन विस्कळीत झाले आहे.




गहू, केळी व लिंबूचे नुकसान

तोत्के चक्रीवादळात अकोला जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला फळे तसेच गहूचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक रस्ते खराब झाले झाडे पडली आहे. विजेचे खांब पडल्यामुळे ग्रामीण भागांमध्ये अंधाराचे साम्राज्य झाले आहे. तसेच शहरी व महानगरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने सर्व्हे करून शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना आधार द्यावा. तसेच नगरपालिका व महानगरपालिकेला आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रहाची मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, हरिनारायण माकोडे, मोनिका गावंडे, माया कावरे ,जयश्री फुंडकर यांनी केली आहे.




शेतीची पाहणी करून पंचनामे करावे

जिल्हा प्रशासनाने तातडीने ग्रामीण भागातील शेतकरी शेतकरी शेतमजुरांच्या शेताची पाहणी करावी. तसेच गावात पडलेल्या घरांची झालेली पडझड नुकसान भरपाई पहावी. अकोला शहर व मुर्तिजापूर, अकोट, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, हिवरखेड, तेल्हारा या परिसराची सुद्धा पाहणी करण्यात यावी.



शेतकऱ्यांच्या पिकांची तसेच फळबाग याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रस्ते खराब झाले आहेत वीज पडल्यामुळे अंधाराचं साम्राज्य झाला आहे त्यावर त्वरित कारवाई करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच महानगरपालिका नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, त्यांना मदत व विशेष निधी देऊन या पावसामुळे चक्रीवादळामुळे झालेले नुकसान संदर्भात विशेष अहवाल तयार करून यांना मदत करावी.  पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदला सुद्धा या संदर्भात शासनाने निधी द्यावा.  सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकरी आपले पीक बाजार पेठ मध्ये विक्रीसाठी आणू शकले नाही. तसेच यामुळे  बाजारपेठेमध्ये भाजीपाला मिळणार नाही. केळीचे लिंबूचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही आंब्याच्या झाडांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे रस्ते व वीज खांब पडले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तसेच वीज वितरण कंपनी महसूल विभाग यांच्या सहकार्याने परिस्थिती पूर्व पूर्व करण्याच्या दिशेने पावले उचलावी, अशी  मागणी व निर्देश आमदार सावरकर यांनी दिली असून, या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी सुद्धा लक्ष केंद्रित केले असून, जिल्हा प्रशासनाला योग्य सूचना दिल्या आहेत.



नागरिकांना कमीत कमी त्रास होईल व या संकटातून मात करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी. एकमेकाला सहाय्य करू, या भूमिकेतून सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी कार्य करावे, अशी आवाहन राज्यमंत्री धोत्रे यांनी केले आहे.  प्रशासनाने ग्रामस्थांना आधार देण्याच्या दृष्टीने ताबडतोब सर्व्हे करून राज्य शासनाकडे अहवाल पाठवावा.  शेतकरी शेतमजूर व त्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांना तातडीने मदतीचा हात द्यावा व त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था साठी हातभार लावावा, हीच परिस्थिती ग्रामीण भागात आहे. 



या चक्रीवादळाने ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी राज्य शासनाने सहकार्य करावे, नामदार धोत्रे यांनी सांगून यासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे अभिवचन अकोलेकरांना ना.धोत्रे यांनी दिले आहे.

टिप्पण्या