Sita navami:Akola: मोठे राम मंदिरात जानकी माता प्रकट उत्सव कोविड नियमांचे पालन करीत साधेपणाने साजरा

मोठे राम मंदिरात जानकी माता प्रकट उत्सव 




ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जगत जननी जानकी माता  प्रकट जन्मोत्सव (सीता नवमी) निमित्त श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्या वतीने आज स्थानिक संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र शताब्दी पूर्व मोठ्या राममंदिरात सामूहिक जानकी मंगल व रामरक्षा पाठ व   ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने श्रीसूक्त पुरुष सूक्त गणपती अथर्वशीर्ष या पाठाने समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा, समिती अध्यक्ष विलास अनासने, मनीषा अनासने यांच्या शुभ हस्ते विशेष पूजा अर्चना करून वैश्विक महामारी पासून मुक्तता होऊन शेतकरी शेतमजूर व्यापारी सर्वसामान्य नागरिक मातृशक्ती चाकरमानी कामगार या सर्वांचे कल्याण व्हावे, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.




जानकी विजेयते रामनवमी शोभायात्रा समितीचे बिद्र वाक्य असून,मातृशक्तीला सन्मान देण्याची परंपरा रामनवमी शोभायात्राची असून प्रत्येक कार्यात मातृशक्ती यांच्या पुढाकाराने विशेष पूजा  करण्यात येते. आजही पुष्पा वानखडे मनीषा भुसारी, सारिका देशमुख, संतोषी शर्मा, जागृती असवारे समितीचे महाव्यवस्थापक गिरीराज तिवारी, अनिल मानधने, नवीन गुप्ता, अजय पांडे, सुमन अग्रवाल, विजय अग्रवाल, विनायक शांडिल्य गुरुजी प्रामुख्याने उपस्थित होते. 




प्रतीकात्मक जन्मोत्सव श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने covid नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणा ने साजरा करण्यात आला. श्री रामनवमी शोभायात्रा समिती सामाजिक दायित्व सोबत अध्यात्म, मानवता, पुरोहितांना, वंचितांना मदतीचा हात देत संस्काराचे कार्य करीत असते. जगत जननी जानकी यांचा जन्मोत्सव निमित्त विशिष्ट अनुष्ठान समितीच्या वतीने करून वैश्विक महामारीतून सावरत पूर्ववत जनजीवन सुरळीत होऊन अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. 



जानकी मंगल पाठ 

आमदार गोवर्धन शर्मा व समितीचे अध्यक्ष विलास अनासने यांनी पूजेत सहभाग घेतला. यावेळी 108 रामरक्षा पाठ, श्रीसूक्त, पुरुष सूक्त पाठ, जानकी मंगल पाठ व महाआरती करण्यात आली. पूजा-अर्चना करून उत्सव साध्या पद्धतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व महत्त्व नगरसेवक गिरीश जोशी यांनी विषद केले. आभार  राम ठाकूर यांनी मानले. नितीन जोशी, बाळकृष्ण बिडवई, अजय जोशी, अजय शर्मा, अजय गुल्हाने, सोनल अग्रवाल, मालती रणपिसे, कल्पना  अडसुले, पद्मा अडसुले, मीराताई वानखेडे, मोहन गुप्ता, संजय अग्रवाल आदी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या