- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Election 2021: निवडणुकीचे निकाल: ममता दीदींना रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयशस्वी; केरळमध्ये काँग्रेसच्या पदरी निराशा!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तृणमूल काँग्रेस
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या जवळपास सर्व जागांचे कल आता हाती येत आहेत. यानुसार ममता बॅनर्जी यांना रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयशस्वी ठरल्याचे चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाने बहुमताच्या 148 जागांचा आकडा आधीच पार केला आहे. सध्या तृणमूल २०० पेक्षा अधिक जागेवर आघाडीवर आहे. तर भाजप आघाडीवर असलेल्या जागा ९० च्या खाली आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून देखील पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांनाच कौल दिल्याचे सध्या तरी असे चित्र आहे.
केरळ मध्ये पुन्हा डावी आघाडी
केरळमध्ये पुन्हा डाव्या आघाडीचे पिनराई विजयन मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चितच झाले आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या पदरी निराशा पडताना दिसत आहे. 140 जागांच्या विधानसभेत सध्या एलडीएफ 89 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा