Education news:शिक्षकांच्या माहे एप्रिलच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शासनाकडून निधी वितरणाला मंजुरी, आमदार सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश




अकोला: कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित होत आहे, याची योग्य वेळी दखल घेऊन शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक (अमरावती विभाग) यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून निधी कसा लवकर उपलब्ध करता येईल, यासाठी प्रयत्न केले. अखेर त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. लवकरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन वितरीत होईल. याबाबतचा शासन निर्णय 18 मे रोजी निर्गमित झाला आहे.






******


विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या समस्या प्राधान्याने सोडवणार



अकोला : विदर्भ मुख्याधापक संघाच्या शैक्षणिक समस्या प्राधान्याने सोडवणार असल्याचे अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ऍड.किरण सरनाईक यांनी सांंगितले.  विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाईन आयोजित सभेत ते बोलत होते. 




कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर तर ऑनलाईन राज्य संघटनेचे अध्यक्ष मारोती खेडेकर, विदर्भ सचिव सतिष जगताप, कार्याध्यक्ष अशोक पारधी, उपाध्यक्ष मंदा उमाठे यांची उपस्थिती होती. 



सभेमध्ये विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकारी यांनी अनेक समस्याबाबत चर्चा केली. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचे नियमित वेतन मिळत नाही. सेवानिवृत्त मुख्याधापकांची अर्जीत रजा, जिपीएफ देयके, कोविड-१९ मध्ये मृत्यु पावलेल्या कर्मचारी यांचे पाल्यांना तुर्त रिक्त पदावर नियुक्ती करणे, वेतनोत्तर अनुदान त्वरीत मंजुर करणे, पवित्र पोर्टल रद्द करणे, कनिष्ठ महाविद्यालय व विद्यालय २० ते ४० टक्के पात्र कर्मचा-यांना ऑफलाईन वेतन, एनईपी २०२० नुसार १० वी. तेथे ११ वी. मागणी नुसार नैसर्गीक वाढीने मान्यता देणे, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा जिल्हास्तरावर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील विद्यार्थी यांचे १०० टक्के लसीकरण त्वरीत करणे आदी महत्वाचे विषयावर चर्चा करण्यात आली.



या प्रसंगी अमरावती विभागाचे नवनित शिक्षक आमदार यांचा संघटने तर्फे शब्द सुमनांनी सत्कार करण्यात आला. सभेला विदर्भातील सर्व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी  सभेला उपस्थित होते.




याप्रसंगी विलास भारसाकळे, सहसचिव दिनेश तायडे, विदर्भ पदाधिकारी संजय नारलावार, राज्य सदस्य ममता गवळी, विदर्भ प्रतिनिधी पद्मावती टिकार, रजीया बेग, कल्पना धोत्रे, प्रविणा शाह, विभा भुसारी, अकोला जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, वाशिम विनोद पाटील,यवतमाळचे प्रकाश बुमकाळे, अमरावती जिल्हा सचिव दिवे, विदर्भ प्रतिनिधी मेघशाम करडे, वर्धा मुख्याध्यापक संघाचे बावस्कर, नागपूरचे ज्ञानेश्वर गलांडे, वाशिमचे तोताराम राठोड, जिल्हा सचिव शिंदे, बुलडाणाचे सचिव रामेश्वर तायडे, प्रेमकुमार सानप आदी सभेला प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे संचालन बुलडाणा जिल्हाध्यक्ष विलास भारसाकळे, संचालन विदर्भ सतिश जगताप तर आभार विदर्भ उपाध्यक्ष मंदा उमाठे यांनी मानले.



टिप्पण्या