coronavirus: W H O ने B.1.617 या सध्या चिंताजनक समजल्या जाणाऱ्या विषाणूच्या प्रकाराला “भारतीय प्रकार” म्हटलेले नाही- केंद्र सरकारने केलं स्पष्ट

                              प्रातिनिधीक फोटो

 


 


नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या B.1.617 या प्रकाराचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक चिंताजनक प्रकारामध्ये केल्याचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहे. यापैकी काही माध्यमांनी B.1.617 हा कोरोना विषाणू म्हणजे “भारतीय प्रकार” असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हंटले आहे. 




दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या B.1.617 या प्रकाराविषयी दिलेल्या आपल्या 32 पानी माहितीमध्ये विषाणूचा हा प्रकार भारतीय असल्याचे म्हटलेले नाही. प्रत्यक्षात या अहवालात “भारतीय” हा शब्दच वापरलेला नाही,असेही  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.




B.1.617 विषाणू उपप्रकार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम महाराष्ट्रात सापडला होता. आता हा विषाणू २१ देशांत सापडला आहे. मात्र, हा विषाणूचा उपप्रकार भारतीय असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलेलं नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. 




दरम्यान, कोरोना विषाणूचा नवा उपप्रकार WHO च्या ६ विभागा मधल्या ४४ देशांमध्ये आढळून आला आहे. B.1.617 हा कोरोनाचा उपप्रकार गेल्या वर्षी भारतात सर्वप्रथम सापडला होता. त्याची वर्गवारी जागतिक चिंतेचा विषय म्हणून करण्यात आली होती, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले.






टिप्पण्या