Akola: Bank: आजपासून जिल्ह्यातील सर्व बँक सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहतील- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश




अकोला: जिल्ह्यात १५ मे चे रात्री १२ वाजेपासून ते दि. १ जून रोजी सकाळी सात वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तथापि, पी.एम. किसान योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना या अंतर्गत प्राप्त अनुदान बॅंक खात्यातून काढण्‍यासाठी नागरीकांची बॅंकेत गर्दी होत आहे. त्‍यामुळे कोविड विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी बँकमध्‍ये होणारी गर्दी टाळण्‍याकरिता आजपासून सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व बँक सुरू राहणार आहे, या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी निर्गमित केले आहेत.


 


काय आहे आदेश


1.सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका,  बिगर बॅंकींग वित्‍तीय संस्‍था, सुक्ष्‍म वित्‍त संस्‍था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था,  विमा , पोस्‍ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था ह्या  सकाळी नऊ ते दुपारी एक या कालावधीत सुरु राहतील.


2. BC/CSP  चे कामकाज ग्रामपातळीवर 24 x 7  सुरु राहिल, या बाबत संबंधीत बॅंकांनी नियोजन करावे.


3. ATM मध्‍ये 24 x 7 रोख रक्‍कम उपलब्‍ध ठेवणे बाबत संबंधित बॅंकांनी नियोजन करावे.


4. खरीप हंगामास सुरुवात होत असल्‍यामुळे शेतकऱ्यांची पीक कर्जाची कामे प्राधान्‍याने करण्‍यात यावीत.


5. कृषी सेवा केन्‍द्र व कृषी निविष्‍ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती औजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, व प्रतिबंध क्षेत्र म्‍हणून  घोषीत करण्‍यात आलेल्‍या गावातील कृषी सेवा केन्‍द्र व कृषी निविष्‍ठांची दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन व तेथील बॅंका या सकाळी नऊ ते दुपारी एक  या कालावधीत सुरु राहतील. 



प्रतिबंधित गावे 

अकोला- सांगवी, डोंगरगाव, उगवा, बोरगाव मंजू, बोरगाव खु सांगळूद 


अकोट- लोहारी, रुईखेड,बोर्डी, चोहट्टा,अकोली जहॉं. 


बाळापुर – व्‍याळा,वाडेगांव, पारस 


बार्शिटाकळी- महान 

मूर्तिजापूर- सिरसो, मदापुरी 


पातूर- असोला, अंबाशी, सस्‍ती, विवरा


तेल्‍हारा – बेलखेड, सौंदळा, हिवरखेड.



असे आदेशात नमूद आहे.

टिप्पण्या