Shriram navami 2021: गुढीपाडवा ते श्रीराम नवमी: नवचैतन्य उत्सव: मंदिरावर आकर्षक रोषणाई... गाभारा सजविला फुलांनी... नवमीच्या पूर्वसंध्येला दीपदान पर्व

        भारतीय सण-उत्सव विशेष

   मोठे राममंदिरातील आकर्षक मूर्ती


        



ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: भारतीय संस्कृतीचा आधार भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव दरवर्षी पारंपरिक पद्धतीने अवघ्या देशात साजरा होत असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी श्रीराम नवमी उत्सव केंद्र व राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावली नुसार साजरा करण्यात येणार आहे. अकोल्यात सुद्धा या उत्सवाची मोठी परंपरा आहे. मात्र, यावेळी सार्वजनिक उत्सव साजरा न करता केवळ धार्मिक रितीरिवाज नुसार पूजा अर्चा करून जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.


श्रीराम नवमी उत्सव निमित्त अकोला शहर अर्थातच राजेश्वर नगरी सजली आहे. शहरातील प्राचीन मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. टिळक रोडवरील मोठे राममंदिर, जुने शहरातील  श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे सुंदर आणि आकर्षक रोषणाई केली आहे. गांधी रोडवरील छोटे राममंदिर, बिर्ला राममंदिर आदी प्रमुख मंदिरांसह अन्य मंदिरात धार्मिक कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून सुरू आहेत.


आकर्षक भव्य रांगोळी

श्रीराम नवमी उत्सव कार्यक्रम हिंदू नववर्ष गुढीपाडवाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येतात.  यावर्षी मोठे राममंदिरात  गुढीपाडवा नववर्ष स्वागता करिता तसेच प्रभू श्रीराम नवमी निमित्त सिद्धहस्त रांगोळी कलाकार अमृता कुशल सेनाड यांनी दहा × बारा  फूट भव्य पोर्ट्रेट रांगोळीच्या माध्यमातून प्रभू श्रीराम चरणी सेवा अर्पण केली. ही भव्य रांगोळी साकारण्यासाठी अमृता यांना तब्बल ३५ तास लागले. माता कौशल्या व बाळ राम मातृत्व प्रेम सिद्ध करणारी रेखाटण्यासाठी   जवळपास ४० किलो रांगोळी लागली.


छप्पन भोग

शताब्दी पूर्व मोठ्या मंदिराला ११६ वर्ष झाले. मंदिर स्थापना निमित्ताने मोठ्या राम मंदिर मध्ये छप्पन भोग (नैवेद्य) दाखवण्यात आला.



मोठे राम मंदिर

संत गजानन महाराज यांच्या इच्छेने साकारलेले आणि पदस्पर्श लाभलेले मोठे राममंदिर शतकापूर्वी स्वर्गीय बच्चू लाल अग्रवाल यांनी स्थापित केले आहे. भगवान श्रीराम,माता सीता, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांची सुंदर, रेखीव आणि विलोभनीय  मूर्ती मंदिरात स्थापित आहे. मंदिर प्रवेशद्वारा जवळ संत गजानन महाराज ज्या शिळेवर बसले होते, ती शिळा येथे जतन केली  असून, भाविकांना दर्शनासाठी ठेवली आहे.


मोठ्या राम मंदिरात दरवर्षीच्या परंपरेनुसार श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. मागील वर्षी  प्रमाणे यावेळी देखील शासनाच्या सूचनेचे पालन करून मंदिराच्या आत मध्ये पुजारी व ट्रस्टी यांनी राम नवमी उत्सव आरंभ केला. प्रसिद्धीच्या वेगवेगळ्या माध्यमातून भक्तांना मंदिराच्या कार्यक्रमाची माहिती व दर्शन भविका पर्यंत पोहचण्याची व्यवस्था मंदिर ट्रस्टने केली आहे. 



   आकर्षक विद्युत रोषणाई

गुढीपाडव्याच्या पहाटे धर्म देवाची स्थापना होऊन रामचरित्रमानस नऊ दिवसीय पाठ  वेद पाठी ब्रह्मवृंद करण्यात आला. नियमित सकाळी अभिषेक विशेष पूजा अर्चना होणार होत आहे. याचे थेट प्रसारण स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनी वरून  करण्यात येत आहे. संस्थेच्या अध्यक्ष सुमन  अग्रवाल यांच्या देखरेखी मध्ये हे विविध कार्यक्रम होत आहेत. नऊ दिवस सुंदर कांड, हनुमान चालीसा, गणपती अर्थ शिष्य, राम रक्षा चा पाठ करण्यात येत आहे. भक्तांसाठी शासनाच्या आदेशानुसार मंदिर खुले नाही. परंतू परंपरा संस्कृती व संस्कार अविरतपणे सुरू राहावे, यासाठी संस्थेने मंदिराच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रामनवमी पर्वावर पारंपरिक पद्धतीने विविध पानफुलांनी मंदिर गाभारा सजविण्यात आला आहे. आंब्याच्या पानांचे तोरण पताका लावण्यात आला आहे.



अष्टमीच्या पर्वावर अकराशे एक दिवे दीपदान

मोठे राम मंदिरात नवीन हिंदू नव वर्षाचे राजा मंगल व सेनापती मंगल असल्यामुळे आज अष्टमीच्या पर्वावर अकराशे एक दिवे दीपदान करून covid-19 पासून चा प्रादुर्भाव थांबून सर्व क्षेत्रातील नागरिक सुखी संपन्न व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. मंदिराचे अध्यक्ष सुमन अगरवाल, उपाध्यक्ष विजय अग्रवाल, विनायक शांडिल्य गुरुजी, मनिष शहा, कल्याण शेवटी  यांच्या मार्गदर्शनात श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष विलास अनासने, अनिल मानधने,  गिरीराज तिवारी,  रामभाऊ खरसे, हेमंत शर्मा ,गिरीश जोशी, सोनल अग्रवाल, पुष्पा वानखडे, चित्रा बापट, दुर्गा जोशी, हरीश चौधरी, हितेश चौधरी, कैलास लातूरकर,  पवनीदेवी चौधरी, विकी झुनझुनवाला  आदींनी आपली कार सेवा प्रधान केली ऑनलाईन दर्शन मंदिरात सुरू आहे. संस्कृती धर्म संरक्षणाचे काम सतत नऊ दिवस वेगवेगळ्या उपक्रम राबवून मोठ्या राम मंदिर परंपरा जोपासली.



श्री रामनवमी शोभायात्रा समिती तर्फे श्रीराम भक्तांना हार्दिक शुभेच्छा






टिप्पण्या