Remdesivir black market: अकोला: एका युवतीसह टोळी जेरबंद; सात आरोपींना 1 मे पर्यंत पोलीस कोठडी, पोलिसांची आता कोविड रुग्णालय व डॉक्टरांवर करडी नजर

Remdesivir Black Market: Akola: Gang arrested with a young woman;  Seven accused in police custody till May 1, police are now keeping a close eye on covid hospitals and doctors (All Photo:B A news 24)






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्ये सोबतच उपचारासाठी प्रभावी समजल्या जाणारी रेमडीसीविरची मागणी सुद्धा प्रचंड वाढली आहे. बऱ्याच ठिकाणी या इंजेक्शनचा तुटवडा असून, या परिस्थितीचा फायदा घेत रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार  सुरू झाला आहे. अकोल्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रेमडेसिविरचे काळाबाजार करणाऱ्या एका टोळीतील पाच सदस्यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. पोलीस चौकशी दरम्यान पोलिसांनी आज या प्रकरणात आणखी सात आरोपींना अटक केली आहे. आज या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता,1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.




विशेष म्हणजे हे सर्व आरोपी शहरातील ३ कोविड रुग्णालयात आणि चार औषध दुकानात काम करणारे आहेत. हे सर्व आरोपी 18 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत. यामध्ये एका युवतीचाही समावेश आहे. रेमडीसीविरचा काळाबाजार करणाऱ्या या टोळीकडून रेमडीसीविरचे तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या या व्यक्तींकडून मोठी साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.





शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन चोरून ते बाहेर अधिक दराने विकणाऱ्या सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. आज आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या सात जणांमध्ये होटेल रीजन्सी येथे काम करणाऱ्या युवतीसह मेडिकल व हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या युवकांचा समावेश आहे. या सात जणांनी तब्बल वीस इंजेक्शनची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केल्याची माहिती आता समोर आली आहे.



दीड ते दोन लाख किंमती इंजेक्शनची चोरी

डाबकी रोडवरील रहिवासी निकिता नारायण वैरागडे (वय २५) वर्ष ही रीजन्सी हॉटेल येथील कोविड सेंटरमध्ये कामाला होती तर कार्तिक मोहन पवार (वय २०) वर्ष राहणार शिवनगर मोठी उमरी हा देशमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कामाला होता. या दोघांसह गौतम नरेश निदाने (वय २०) वर्ष राहणार शिवाजी नगर हा युनिक हॉस्पिटल कोविड केअर सेंटर येथे कामाला होता. अभिषेक जगदीश लोखंडे (वय २२) वर्षे राहणार मोठी उमरी, शुभम दिनेश वराडे (वय २०)  राहणार लाडीस फाईल अकोट फाईल, देवेंद्र संजय कपले (वय २२ वर्षे) राहणार मोठी उमरी व अंकित संतोष तिकांडे (वय १८) वर्षे राहणार मोठी उमरी या सात जणांनी कोविड तब्बल वीस रेमडेसिविर इंजेक्शन या केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची इंजेक्शन त्यांना न देता त्या माध्यमातून तब्बल दीड ते दोन लाख किंमती इंजेक्शनची चोरी केली. त्यानंतर या रुपयांची उलाढाल त्यांनी केली आहे. इंजेक्शनची शहरातील विविध कोविड याप्रकरणी सातही आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.





डॉक्टरांवरही लवकरच फौजदारी कारवाई

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी असलेले रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना न देता त्याची परस्पर विक्री करण्यात येत होती. या प्रकाराला डॉक्टरांचा व रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण जबाबदार आहे.  हे बेजबाबदार वर्तन आता डॉक्टरांनाही भोवणार असल्याची माहिती आहे. ज्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन चोरुन बाहेर विकल्या गेले त्या डॉक्टरांवरही लवकरच फौजदारी कारवाई करणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली आहे. 



शहरात रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत असल्याने काळाबाजार वाढत आहे. परवानगी नसतांना या टोळीतील सदस्यांनी हे इंजेक्शन आणले कुठून ? ज्याने या टोळीला हे इंजेक्शन पुरवले त्याने कोणत्या आधारावर हे इंजेक्शन या टोळीला दिले ? यामध्ये कोविड रुग्णालय आणि डॉक्टरतर सामील नाही ना याचा तपास आता पोलीस करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा (अकोला) पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी दिली.






टिप्पण्या