Patur fire: पातूरच्या मोमीनपुरा मध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोन जखमी


*घराला लागलेली आग अग्निशमन दलाने  विझवली



अकोला: पातुर शहरातील मोमीनपुरा येथे मंगळवारी सकाळी दहा वाजता घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात दोन जखमी झाले. तसेच आगीत दहा हजार रुपयाची राशी जळाली आणि जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



सिलेंडरचा भडका

पातुर शहरातील मोमीन पुरात राहणाऱ्या अल्फिया सकाळी दहा वाजता स्वयंपाक गृहात चहा बनवण्यासाठी गेल्या असता गॅस स्टोव्ह सुरू केला असता, सिलेंडरचा भडका उडाला. यामध्ये अल्फिया यांचे हात आणि पाय भाजले. स्फोट होताच अल्फिया यांनी किंकाळी फोडली. त्यांच्या मदतीला धावून आलेला चुलत भाऊ रिजवान (वय 28) याची सुद्धा या घटनेत हात आणि पाय भाजले. 



22 हजार रुपयांच्या नोटा व साहित्य जळून खाक

घटनेची माहिती कळताच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दुलेखा यांनी जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले. त्यानंतर जखमींना अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका मार्फत पाठविण्यास मदत केली केली. सिलेंडरचा भडका झाल्याने व्यापारी इक्बाल अंसरी यांच्या घराला आग लागली  आग मध्ये  त्यांचे 22 हजार रुपयांच्या नोटांसह इतर साहित्य जळून खाक झाले.



पातुर अग्निशामक दलाचे वाहन चालक अशपाक सय्यद मुश्ताक, फायरमन प्रकाश चावरे, प्रल्हाद वानखेडे, आकाश तेजपाल आदींनी तातडीने आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेचा पंचनामा पातुर मंडळाचे प्रभारी मंडळ अधिकारी एम. पी. नाईक व तलाठी शुभम तिवारी यांनी केले. अहवालानंतर आग पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल.

टिप्पण्या