Fire :मोठी उमरी येथे एका घराला आग



अकोला:  विठ्ठल नगर मोठी उमरी परिसरातील  येडेश्वरी मंदिरा समोरच्या एका घराला सोमवारी आग लागली. रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटनास्थळी अकोला अग्निशमन दल दाखल झाली असून,

आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. या घटनेत सुदैवाने जीवितहानी  झाली नाही. आग कशाने लागली याचे कारण वृत्त लिहेपर्यंत कळले नाही.

टिप्पण्या