corona update:Akola: आज दिवसभरात २६३ नवे बाधित; सायंकाळी २ रुग्णांचा मृत्यू

              *कोरोना अलर्ट*
                                     file image

*आज बुधवार दि. ७ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १७५३* 
*पॉझिटीव्ह-१७२*
*निगेटीव्ह-१५८१*


आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (सकाळ)-१११+आरटीपीसीआर(सायंकाळ)-६१+ रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट-९१= २६३


 *अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ६१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २६ महिला व ३५ पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील १४, मुर्तिजापूर येथील नऊ, साहित येथील तीन, रणपिसेनगर, केशव नगर आणि नर्सिंग होस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरीत जवाहर नगर, गितानगर, आदर्श कॉलनी, डाबकी रोड, बार्शी टाकळी, कान्हेरी सरप, मलकापूर, जांभळून, महान, जमकेश्वर,  तेल्हारा, शिरसोली, मिर्जापूर, दताळा, शेरवाडी, तपे हनुमान नगर, जुने शहर, देशमुख फाईल, जीएमसी, मोठी उमरी, विझोरा, मराठा नगर, दिवेकर आखाडा, माळीपुरा, राहित, हाता, खडकी, शिरसगाव आणि अकोट फाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



आज सायंकाळी खाजगी रुग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात खोलेश्वर येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे तर अन्य रुग्ण नकाशी ता. बाळापूर येथील ७० वर्षीय महिला रुग्ण आहे. या रुग्णास दि.४ रोजी दाखल करण्यात आले होते.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४२, आयकॉन हॉस्पिटल-दोन, हार्मोनि हॉस्पिटल- तीन, क्रिस्टल हॉस्पिटल-पाच, बिहाडे हॉस्पिटल-११, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर-तीन, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल-तीन, हॉटेल स्कायलार्क- दोन,  समाजकल्याण वसतीगृह-१८,  बार्शी टाकळी कोविड केअर सेंटर-दोन, नवजीवन हॉस्पिटल-दोन, हॉटेल रिजेन्सी-चार, सुर्यचंद्र हॉस्पिटल-तीन, बाळापूर कोविड केअर सेंटर-दोन, ओझोन हॉस्पिटल-चार तर होम आयसोलेशन मधील २१३ असे एकूण ३१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२३६९३+५६८८+१७७= २९५५८*
*मयत-४८६*
*डिस्चार्ज-२५३०९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-३७६३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या