*कोरोना अलर्ट*
*आज रविवार दि. ४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- १३१४*
*पॉझिटीव्ह-१६१*
*निगेटीव्ह-११५३*
*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) १२२+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ३९+ रॅपिड १०५=२६६
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २० महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील १५, पारस व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, खानापूर वेस ता.अकोट येथील दोन, तर उर्वरित जूना अंदुरा, रौंदला, न्यु तापडीया नगर, राधाकिसन प्लॉट, गड्डम प्लॉट, रतनलाल प्लॉट, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, माना, गायत्री नगर, आपातापा रोड,जूना आळसी प्लॉट, शाहनूर ता.अकोट, चिंचपानी ता.अकोट व आसेगाव ता.अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज सायंकाळी मुर्तिजापूर येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या पुरुषास दि. १ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, सहारा हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील चार, देवसार हॉस्पीटल येथील एक, नवजीवन हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील दोन, समाज कल्याण हॉस्टेल येथील २५, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील तीन तर होम आयसोलेशन येथील ५७०, असे एकूण ६४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२३२४५+५४०९+१७७= २८८३१*
*मयत-४७०*
*डिस्चार्ज-२४०२५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४३३६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा