corona update:Akola: एकूण पॉझिटीव्ह- ४६९: दहा जणांच्या मृत्यूची नोंद , ७७५ जणांना डिस्चार्ज

             *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २५ एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-२२२८*
*पॉझिटीव्ह-३८९*
*निगेटीव्ह-१८३९*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३८९+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ८०= एकूण पॉझिटीव्ह- ४६९



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ३८९ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५६ महिला व २३३ पुरुषांचा समावेश आहे. 



त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-३६, अकोट-४३, बाळापूर-आठ, बार्शी टाकळी- २५, पातूर-११, अकोला-२६६. (अकोला ग्रामीण-३४, अकोला मनपा क्षेत्र-२३२)



आज दिवसभरात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात चैतन्य नगर, सिव्हील लाईन येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य शिवाजी नगर येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील ५९ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील ८२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच वरखेड ता.बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला असून या महिलेस दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, दहिहांडा ता.अकोट येथील ६३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते. तर टाकळी बु.ता. अकोट  येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते. तर पातूर येथील ८० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. अन्वी मिर्झापूर येथील ४० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, ७० वर्षीय अज्ञात पुरुष रुग्णास दि. २४ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील आठ, देवसार हॉस्पीटल येथील एक, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील आठ, मुलांचे वसतीगृह येथील ११, खैर उम्मत हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, जिल्हा रुग्णालय अकोला येथील १६, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील आठ, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन हारमोनी हॉस्पीटल येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ६६० असे एकूण ७७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२९३८८+८१०७+१७७= ३७६७२*
*मयत-६२९*
*डिस्चार्ज-३१०४६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५९९७*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)



*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या