corona update:Akola: आज एकूण पॉझिटीव्ह-५६४; आठ जणांच्या मृत्यूची नोंद

              *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. २३ एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २१२८*
*पॉझिटीव्ह-३८३*
*निगेटीव्ह-१७४५*


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३८३+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १८१= एकूण पॉझिटीव्ह-५६४


*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ३८३ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४३ महिला व २४० पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-२९, अकोट-५४, बाळापूर-२९, तेल्हारा-११, बार्शी टाकळी-१८, पातूर-२०, अकोला-२२२. (अकोला ग्रामीण-३८, अकोला मनपा क्षेत्र-१८४)

आज दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात टाकळी खु., अकोट येथील ३५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १४ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य काजळेश्वर ता.बार्शीटाकळी येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते, भवानी पेठ येथील ५१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, अशोक नगर ता.अकोट येथील ५३ वर्षीय महिला असून या महिलेस दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, तर जूने शहर येथील २४ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, कौलखेड येथील ७१ वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते.  जूने शहर येथील ५५ वर्षीय महिला रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते. तर एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण सिव्हील लाईन येथील ७० वर्षीय महिला असून त्यांना दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. 




दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, आधार हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील सहा, उषा मल्टीस्पेशेलीटी येथील एक, एच एस पाटील हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील आठ, यकीन उन्नती हॉस्पीटल येथील येथील पाच, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ, नवजीवन हॉस्पीटल येथील दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील चार, इंदिरा हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, आरकेटी महाविद्यालय येथील दहा, समाज कल्याण हॉस्टेल येथील आठ, तर होम आयसोलेशन मधील १८७ असे एकूण ३०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२८६१९+७९१३+१७७= ३६७०९*
*मयत-६१०*
*डिस्चार्ज-२९६७७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-६४२२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या