Corona update:अकोला: आज सकाळी १३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह;तिघांचा मृत्यू, रॅपिड अँटिजेंन चाचण्यात ११२ पॉझिटिव्ह

            *कोरोना अलर्ट*

                                       संग्रहित चित्र


*आज गुरुवार दि. ८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल- ११४१* 

*पॉझिटीव्ह-१३०*

*निगेटीव्ह-११११*


*अतिरिक्त माहिती*


आज सकाळी १३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४३ महिला आणि ८७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मोठी उमरी येथील नऊ,  रामदास पेठ व जीएमसी येथील प्रत्येकी सहा, मलकापुर आणि पोलीस हेडक्वार्टर येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा आणि राऊतवाडी येथील प्रत्येकी चार, वरुड बिऱ्हाडे, आळशी प्लॉट, खडकी, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन,  वांगरगाव, शास्त्री नगर, गांधी चौक, पोळा चौक, न्यू तापडीया नगर, जठारपेठ, डाबकी रोड, द्वारका नगर, व्याळा, बाळापूर, वृंदावन नगर, उगवा, यमुना नगर, रजपूतपुरा, येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत पारखेड, उकडीबाजार, जवाहर नगर, गोकुळ कॉलनी, पीकेव्ही,कोठारी वाटिका, जुने शहर, ताज नगर, दीपक च्व्हौक, रामी हेरीटेज, अकोट फैल, शंकरनगर, कौलखेड, दहिहांडा, खिरपुरी खु., गोरवा, जीएमसी क्वार्टर, जापान जीन, अक्कलकोट, मित्रनगर, नायगाव, राजंदा, मनोरमा कॉलनी, जांबा बु.,  गोकुळ कॉलनी, गुडदी, आदर्श कॉलनी, गायत्री नगर, तापडीया नगर, बार्शी टाकळी, महसूल कॉलनी, टाकळी बु., डोंगरगाव, उमरी नाका, शिवर, हरिहरपेठ, फडके नगर, शिवसेना वसाहत, बालाजी नगर, महात्मा फुले नगर, वाडेगाव, किनगाव,  कपिलानगर, शिवनी, अकोट, बोरगाव मंजू, पारस, हमजाप्लॉट, माळीपुरा, पातुर आणि कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


आज सकाळी तिघांचा मृत्यू झाला. या तीनही महिला आहेत. त्यात अकोट फैल येथील ४७ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेस दि.८ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक कासारखेड ता. बार्शी टाकळी येथील ६५ वर्षीय महिला असुन या या महिलेस दि.३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य अकोट येथील ६२ वर्षीय महिला असून या महिलेस दि.२९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.


दरम्यान काल(दि.७) रोजी रॅपिड अँटिजेंन चाचण्यात ११२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्येत व ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह संख्येत करण्यात आला आहे,याची कृपया नोंद घ्यावी,ही विनंती.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२३८२३+५८००+१७७= २९८००*

*मयत-४८९*

*डिस्चार्ज-२५३०९*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४००२*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*



रॅपिड ॲन्टीजन टेस्ट 

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.७) दिवसभरात झालेल्या २२६३ चाचण्या झाल्या त्यात ११२  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


काल दिवसभरात अकोला येथे ३३३ चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,   अकोट येथे ९६ चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे १४५ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे ८० चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे ८९ चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे ३० जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.  मुर्तिजापूर येथे २०३ चाचण्या झाल्या त्यात ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेमार्फत ११८६  चाचण्या झाल्या त्यात ६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आय एम ए येथे सहा चाचण्या झाल्या त्यात  तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ३० चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६५ चाचण्या झाल्या त्यात १६  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  असे  एकूण २२६३ चाचण्यात ११२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ७८ हजार ३७७ चाचण्या झाल्या पैकी ५८७९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.


टिप्पण्या