corona update: अकोला: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-६७२; दहा जणांच्या मृत्यूची नोंद, ४३८ जणांना डिस्चार्ज

               *कोरोना अलर्ट*

आज गुरुवार दि. २९ एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,


*प्राप्त अहवाल- २५५३*
*पॉझिटीव्ह-५०४*
*निगेटीव्ह-२०४९*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ५०४+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १६८= एकूण पॉझिटीव्ह-६७२



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ५०४ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २०८ महिला व २९६ पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-७८, अकोट-६७, बाळापूर-२५, तेल्हारा-३७, बार्शी टाकळी-२० पातूर-३३, अकोला-२४४. (अकोला ग्रामीण-२८, अकोला मनपा क्षेत्र-२१६)



आज दिवसभरात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात अक्कलकोट भोईपूरा येथील ७६ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य कैलास नगर येथील ५५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, जनूना ता. बार्शीटाकळी येथील ५५ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी ताथोड नगर येथील ६८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी  येथील ४२ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते,अकोट येथील ७२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच पारस ता. बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते, दहिहांडा येथील ८१ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच दोन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात मिर्झापूर अन्वी येथील ६२ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य  येथील ७२ वर्षीय महिला असून त्याना दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील नऊ, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर येथील ५४ तर होम आयसोलेशन मधील ३१५ असे एकूण ४३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-३०७५९+८६८७+१७७= ३९६२३*
*मयत-६७८*
*डिस्चार्ज-३३७०१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५२४४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या