File photo
भारतीय अलंकार 24
मुंबई: महाराष्ट्र राज्यात वाढत्या कोरोना विषाणू रुग्ण संख्येमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्य सरकारने आता निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज रविवारी दुपारी अत्यंत तातडीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाउन न लावता केवळ वीकेण्ड लॉकडाऊन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.
काय सुरू काय बंदशुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. तर उर्वरित दिवसांमध्ये देखील निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत.
मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के क्षमतेने सुरू राहील असा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर रिक्षा, खासगी वाहतूक यांच्यावर बंदी घालण्यात आलेली नाही.
शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित व्यवहार बंद राहतील.
वीकेण्ड व्यतिरिक्त उर्वरित दिवसांसाठी नाईट कर्फ्यू लावला जाणार आहे.
तर दिवसा जमावबंदी लागू असेल.
मॉल्स, थिएटर, बार बंद ठेवले जातील. तर हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा सुरू राहणार आहेत.
(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा