Corona impact:अकोला: कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर जनता भाजी बाजार येथे भाजी व फळ विक्री करण्‍यास पुर्णपणे बंदी



 


अकोला: महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर आळा घालण्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांना सोईचे व्‍हावे याकरिता जनता बाजार येथील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची मनपा प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र मनपा आयुक्‍त यांच्‍या व्‍दारे जनता बाजाराची पाहणी केली असता या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे तसेच सदर ठिकाणचे व्यवसायिक हे कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्‍याने आणि जनता बाजार येथुन कोरोना विषाणुचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्‍याने मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांनी अकोला शहरातील जनता भाजीबाजार संदर्भात खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.




जनता भाजी बाजार येथील होलसेल व किरकोळ भाजीपाला व फळ विक्रीस दिनांक 23 एप्रिल ते 2 मे 2021 पर्यंत पुर्णत: बंदी राहील, जनता बाजार येथिल किराना व कृषीसेवा केंद्राची दुकाने ही सकाळी 7  ते 11 वाजेपर्यंत सुरु राहतील. या व्यतीरीक्त कोणतीही दुकाने सुरु राहणार नाहीत, भाजीपाला व फळ हर्रासी करण्याकरिता महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा राहील. महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्याकरिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणुन जनता भाजी बाजाराचा यापूढे हर्रासी करीता वापर करता येणार नाही, जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेहअली चौक येथे किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यवसायीक यांना भाटे क्लब प्रांगण येथेच व्यवसाय करणे बंधनकारक राहील.  



जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेहअली चौक येथे किरकोळ फळ विक्री करणारे व्यवसायीक यांना मुंगीलाल बाजोरिया प्रांगण येथेच व्यवसाय करणे बंधनकारक राहील, किरकोळ भाजीपाला व फळ विक्री करीता व्यवसायीक यांना परवानगी दिलेल्या जागेत कोरोना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करावा. दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये व्यवसाय करीत असल्याचे आढळुन आल्यास प्रशासनाकडुन व्यवसायीकांवर कोराना नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे गृहित धरुन कठोर कारवाई करण्यात येईल. व्यवसाय धारकांना व्यवसाय करतांना सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. 




आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या व्‍यावसायिकांविरुध्‍द महाराष्‍ट्र महानगरपालिका अधिनियम व साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 2005 अन्‍वये कारवाई करण्‍यात येईल. तरी व्‍यावसायिकांनी याची नोंद घेउन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन मनपाने केले आहे.

टिप्पण्या