- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file image
भारतीय अलंकार 24
अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फडके हॉस्पिटल परिसरात येणाऱ्या परिसरात सौरभ सुळे नामक तिशीतील युवकाची हत्या झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या हत्याकांड प्रकरणी सौरभचे मित्र असलेल्या तीन युवकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ परिसरातील फडके हॉस्पिटल नजीक गल्लीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक चौकशीत सौरभ सुळे असे मृतकाचे नाव असल्याची माहिती समोर आली. मृतक युवक हा दिवेकर आखाडा नजीक अथर्व अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सौरभचे मित्र असलेल्या तीन युवकांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
सुनील वाडेकर, उमेश सुखदेवे आणि अमोल वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. हत्याकांड करण्यामागील उद्देश अद्याप समोर आला नाही. पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा