Akola crime: murder: शिवसेना वसाहतीत मित्राने केली मित्राची हत्या; आरोपी ताब्यात



भारतीय अलंकार 24

अकोला: शहरात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचे काल शनिवारी रात्री दोन हत्याचे प्रकरण उघडकीस आल्याने परत एकदा सिद्ध झाले आहे. एक जठारपेठ परिसरात तर दुसरी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहतीत क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले.




पोलीस सुत्रांनी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी बाबूलाल शेळके व अमर उर्फ विकी अग्रवाल हे दोघे मित्र असून, शनिवारी रात्री ते दोघे सोबत होते. यावेळी अमर व बाबूलाल यांच्यात 'तू-तू मै-मै' झाली. सुरुवातीला गंमत गंमत म्हणून एकमेकांना मारहाण झाली. नंतर मात्र, या मारहाणीचे रूपांतर तुफान मारामारीत झाले. अमरने बाबूलाल याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघांमध्ये आणखी वाद पेटत गेला. या दरम्यान अमर अग्रवाल याने बाबूलाल शेळके याच्या मानेवर जोरात लाथ मारल्याने शेळके याचा जमिनीवर कोसळून मृत्यू झाला.



या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठले. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, जुने शहरचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. 




आरोपी अमर उर्फ विक्की अग्रवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीच्या जबानी वरून भारतीय दंड विधान कलम ३०२ व इतर कलमान्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेचा अधिक तपास जुने शहर पोलीस करीत आहेत.


टिप्पण्या