Akola crime: murder: जठारपेठ परिसरात युवकाची हत्या;आर्थिक वादाची किनार

                                      file photo



भारतीय अलंकार 24

अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ भागात फडके हॉस्पिटल परिसरात एका तिशीतील  युवकाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सौरभ सुळे असे मृतकाचे नाव असून, प्रकरणातील आरोपी हे अज्ञात असल्याचे सूत्रांनी सांगितले.




सविस्तर माहिती अशी की, रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ भागातील फडके हॉस्पिटल रिजन्सी हॉल जवळच्या गल्लीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले . 




सौरभ सुळे असे मृतकाचे नाव असून, मृतक युवक दिवेकर आखाडा जवळील अन्नपूर्णा अर्पाटमेंट आहे.त्याचे वडील शिक्षक आहेत. या हत्याकांडाला आर्थिक वादाची किनार असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. मात्र, याला अद्याप पुष्टी मिळाली नाही. पुढील कारवाई रामदास पेठ पोलीस करीत आहे.



टिप्पण्या