School education: 'व्हीव्हीएम'मध्ये पराग महाराष्ट्राचे नेतृत्व करणार!




भारतीय अलंकार24

अकोला: भारत सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार घेण्यात आलेल्या विद्यार्थी विज्ञान मंच (व्हीव्हीएम)च्या राज्यस्तरीय शिबिरात आयोजित परीक्षेत अकोल्यातील नोएल इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी पराग महादेव चिमणकर याने राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला असून, त्याची निवड राष्ट्रीय शिबिरासाठी झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर तो आता महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. 





विज्ञान भारती, राष्ट्रीय विज्ञान प्रसार आणि एनसीईआरटी यांच्यामार्फत २८ फेब्रुवारी २०२१ रोजी राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात आली. राष्ट्रीय विज्ञान दिन ३ मार्च रोजी परीक्षेचा ऑनलाईन निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये कोठारी वाटिका क्र.४, अकोला येथील पराग महादेव चिमणकर या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले. त्याने महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावला असून, राष्ट्रीय स्तरावर तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.




प्रथम त्याची जिल्हास्तरावर निवड होऊन त्याने राज्यस्तरीय शिबिर ऑनलाईन पूर्ण केले. यासाठी आवश्यक साहित्य डाऊनलोड करून अभ्यास केला.  त्याचा मोठा भाऊ हर्षल चिमणकर याचीही त्याला अभ्यासात मदत मिळाली. त्यांनी ऑनलाइन पेक्षा प्रत्यक्ष शिक्षणावर भर दिला. ऑनलाइन पद्धतीने अनुभव कमी मिळतो.  प्रत्यक्ष शिक्षणाचा फायदा व अनुभव जास्त प्रभावित व लक्षात राहण्यासारखा असतो, असे पराग चिमणकरने  मुलाखतीत सांगितले. परागच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या