bageshwar-baba-shivsena-akl: शिवरायांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात उद्धवसेनेची पोलीस तक्रार
bageshwar-baba-shivsena-akl: शिवरायांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर बाबाविरोधात उद्धवसेनेची पोलीस तक्रार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाखावटीच्या निर्णयानंतर एक वर्ष होऊनही लाभार्थ्यांना पैसे देणार नसू, तर होणाऱ्या कुपोषणाला जबाबदार कोण ? देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला सवाल
भारतीय अलंकार 24
मुंबई : श्रमजीवी संघटनेने मंगळवारी आदिवासी विकास मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाचे पडसाद आज अधिवेशनात उमटले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खावटीच्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरत, खावटीच्या निर्णयानंतर एक वर्ष होऊनही लाभार्थ्यांना पैसे देणार नसू, तर होणाऱ्या कुपोषणाला जबाबदार कोण ? असा थेट सवाल फडणवीस यांनी सरकारला केला.
तसेच यावेळी त्यांनी श्रमजीवी संघटनेने आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात ठाणे, पालघर, नाशिक व रायगड मध्ये ४५ ठिकाणी पोलिसांत आदिवासींची फसवणूक केल्याबाबतची तक्रार दाखल केल्याचा उल्लेख देखील केला. त्यामुळे खावटी योजनेच्या तात्काळ अंमलबजावणी साठी सरकारने कोणती पावले उचलते याकडे राज्यातील आदिवासी बांधवांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा