- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, एकलारा गावचे प्रदीर्घ काळ सरपंच पद भूषविलेले तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे जेष्ठ सेवक मुकुटराव (अवचितराव) नत्थुजी बेले पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज बुधवारी सकाळी निधन झाले.
त्यांचेवर एकलारा येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. खारपाण पट्ट्यातील सधन कास्तकार म्हणून त्यांची ख्याती होती. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेश व प्रसिद्ध वकील विलास अशी त्यांना दोन मुले आहेत.
राजकारणात अनेकदा संधी मिळूनही ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने जगत राहिले, त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा