- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: दाणा बाजार येथील श्रीनाथजी हवेलीचे मुखीया श्री मदनमोहन व्यास यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी निधन झाले.
व्यास हे गेल्या अनेक वर्षांपासून श्रीनाथजींची सेवा करीत होते. वडील मुखीयाजी उगमलाल व्यास यांच्या पश्चात त्यांनी प्रमुख म्हणून सेवा दिली आहे. त्यांच्या निधनाने वैष्णवांना मोठा धक्का बसला आहे.शांत आणि हसमुख स्वभावाचे मदनमोहन व्यास यांनी आज सायंकाळी शेवटचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या गीता नगर मधील निवासस्थान येथून गीता नगर मोक्षधाम येथे शासकीय नियमानुसार उद्या सोमवार ८ मार्च रोजी दुपारी एक वाजता निघणार आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा