Holi:Good Friday: होळी, धुलीवंदन, गुडफ्रायडे व इस्टर साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

                                     File image



भारतीय अलंकार 24

अकोला: होळी, धुलिवंदन, गुडफ्रायडे व इस्टर संडे हे सण रविवार २८ मार्च ते  रविवार ४ एप्रिल या कालावधीत आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश या पुर्वीच जारी करण्यात आले आहेत. हे सण साजरे करण्याबाबत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. या सुचनांचे पालन करुन नागरिकांनी सण अत्यंत साधेपणाणे साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.




होळी, धुलीवंदन, रंगपंचमी बाबत सूचना

कोणत्याही प्रकारे गर्दी न करता हा सण साजरा करावा. धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाणे साजरे करावे. काही ठिकाणी होळी शिमगा निमित्त मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, गर्दी होणार नाही याची काळजी घेत  दर्शनाची सोय करावी. कोणत्याही प्रकारे  धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नये.




 गुड फ्रायडे व इस्टर बाबत सुचना

                                    file image


२८ मार्च ते ४ एप्रिल या होलि विक  (holi week) दरम्यान प्रत्येक प्रार्थना सभेच्या वेळी चर्च मध्ये उपलब्ध जागेनुसार लोकांच्या उपस्थितीचे नियोजन करावे. जास्तीत जास्त ५० व किमान १० ते २५ लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. सामाजिक अंतर कायम राहिल याची खबरदारी घेऊन  आवश्यकते नुसार चार ते पाच प्रार्थना सभांचे वेगवेगळ्या वेळी आयोजन करावे. प्रार्थनेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याची खबरदारी घ्यावी. चर्चच्या व्यवस्थापकांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. 




या सणांनिमित्त दिले जाणारे संदेश  सोशल मिडीयातून प्रसारित करावे. चर्चच्या बाहेर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. मिरवणूका व गर्दी आकर्षित होईल असे कार्यक्रम आयोजित करु नये. स्थानिक प्रशासन तसेच पोलीस व  आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

टिप्पण्या