corona update:Akola: आज दिवसभरात २५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

            *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-९१८*
*पॉझिटीव्ह-१३७*
*निगेटीव्ह-७८१*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) ९१+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ४६+ रॅपिड ११९=२५६

*अतिरिक्त माहिती*

 आज सायंकाळी ४६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १७ महिला व २९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बार्शीटाकळी येथील पाच, डाबकी रोड येथील चार, तारफैल येथील तीन, तुकाराम चौक व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित म्हैसपूर, प्रतिकनगर, आसरा कॉलनी, पंचशील नगर, आगर, तेल्हारा, बाळापूर, शिवणी, अनिकट, खोलेश्वर, नवरंग सोसायटी, गौरक्षण रोड, आळशी प्लॉट, शिवनगर, रजपूतपुरा, मोठी उमरी, अयोध्या नगर, गंगा नगर, विजय नगर, गोकूल कॉलनी, शिवाजी पार्क, दुर्गा चौक, तोष्णीवाल लेआऊट, रतनलाल प्लॉट, अंभोरा, गणेश नगर, समता नगर, पळसोळा, माना व राहित येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.


दरम्यान आज सायंकाळी व्दारका नगरी, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, सहारा हॉस्पीटल येथील तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, खैर उम्मीद हॉस्पीटल सोनोरी मुर्तिजापूर येथे दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील तीन, बाईज हॉस्टेल अकोला येथील आठ, नवजीवन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील पाच, आर्युवेदिक महाविद्यालयातून १७, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, इंद्रा हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील आठ, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील ६७१ जणांना असे एकूण ७८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२२५१२+५०११+१७७= २७७००*
*मयत-४५३*
*डिस्चार्ज-२१४६३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५७८४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या