corona update:Akola:आज सकाळी १९५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह; तिघांचे मृत्यू, रॅपिड टेस्ट ७३ पॉझिटीव्ह

             *कोरोना अलर्ट*



*आज शुक्रवार दि. १९ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ९९२*  
*पॉझिटीव्ह-१९५*
*निगेटीव्ह-७९७*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १९५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५९ महिला व १३६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील धोतर्डी येथील १५, बार्शीटाकळी येथील १३, पातूर, नंदापूर ता.पातूर व टाकळी खुर्द येथील प्रत्येकी सात, कौलखेड येथील सहा, भोड येथील पाच, कान्हेरी गवळी, रेणूका नगर, गायगाव, जीएमसी, तापडीया नगर, सिंधी कॅम्प, बाळापूर व गांधीग्राम येथील प्रत्येकी चार, गौरक्षण रोड, जठारपेठ, अकोट फैल, महागाव, कापशी रोड, रणपिसे नगर, उमरी, गांधी रोड येथील प्रत्येकी तीन,  सुधीर कॉलनी, मलकापूर, बालाजी नगर, सिंधखेड, गजानन नगर, हरिहर पेठ, नकाक्षी, लांगापूर, दिवेकर चौक, पळसोबढे, खोलेश्वर येथील प्रत्येकी दोन,  तर उर्वरित कॉग्रेस नगर, पिकेव्ही कॉलनी, गौतम नगर, गॅस गोडाऊन, किर्ती नगर, शास्त्री नगर, खैर मोहम्मद प्लॉट, सिव्हील लाईन, गोकूल कॉलनी, बलोदे लेआऊट, राहुल नगर, रुस्तमाबाद, गिता नगर, ऐंरडा, काजळेश्वर, पिंपळखुटा, मोठी उमरी, वाशिम बायपास, जमकेश्वर, सस्ती, जामरुन, वारुळी, वाकी, माझोड, बोरगाव, हातरुण, गड्डम प्लॉट, तुकाराम चौक, श्रध्दा नगर, जवाहर नगर, आखतवाडी, खडकी, रजपूतपुरा, माधव नगर, कृषी नगर, खदान, शंकर नगर, पिंपळगाव, वाडेगाव, संतोष नगर, चोहट्टा बाजार, दुर्गा चौक, वसंत टॉकीज, मलकापूर, मोरेश्वर कॉलनी, आयुके निवास, बापू नगर, पोलिस लाईन, देशमुख फैल, खदान, चांदुर, भारती प्लॉट, तोष्णीवाल लेआऊट, तेल्हारा, खोडके नगर, भिम नगर व व्हिएचबी कॉलनी येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज तिघांचे मृत्यू झाले. त्यात सिंधी कॅम्प, मुर्तिजापूर येथील ३२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून या महिलेस दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य लहान उमरी, अकोला  येथील रहिवासी असलेला ६८ वर्षीय पुरुष रुग्ण असून त्यांना दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते, मराठा नगर, अकोला येथील ९० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून या महिलेस दि. १२ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ७३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१९३५२+३८७४+१७७=२३४०३*
*मयत-४१९*
*डिस्चार्ज-१७३५१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५६३३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या