*कोरोना अलर्ट*
*आज मंगळवार दि. ९ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- १६०८*
*पॉझिटीव्ह-१५३*
*निगेटीव्ह-१४५५*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी १५३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २४ महिला व १२९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील ३०, मुर्तिजापूर येथील २१, मोठी उमरी व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी व शिवनगर येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, जूने शहर, न्यु तापडीया नगर व पंचशील नगर प्रत्येकी तीन, मुंडगाव, डाबकी रोड, रजपूतपुरा, रामदासपेठ, मारोती नगर, कॉग्रेस नगर, लहान उमरी, मलकापूर, कौलखेड, गोरक्षण रोड, पोलिस क्वॉटर, पिंपळगाव, वाशिम बायपास, सिंधी कॅम्प, सिरसो, गजानन नगर व हिंगणा रोड प्रत्येकी प्रत्येकी दोन, तर उर्वरित रुईखेड, सिरसोली, वडाळी सटवाई, जऊळका, अकोली जहागीर, शिवणी, संभाजी नगर, खदान, नानक नगर, गिता नगर, निमवाडी, लक्ष्मी नगर, कसूरा, भारती प्लॉट, माळा नगर, शास्त्री नगर, न्यु खेतान नगर, वाडेगाव, देशमुख फैल, तुकाराम चौक, बाळापूर रोड, रणपिसे नगर, माळीपुरा, आपातापा रोड, न्यु राधाकिसन प्लॉट, राहुल नगर, अकोट फैल, जीएमसी, शिवाजी नगर, दताळा, बोरगाव खुर्द, गोडबोले प्लॉट, चहाचा कारखाना, शिवसेना वसाहत, हरिहर पेठ, खैर मोहमद प्लॉट, व्हिएचबी कॉलनी व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज दोंघाचा मृत्यू झाला. त्यात सांघवी बाजार,अकोला येथील रहिवासी असलेली ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ३ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य शास्त्री नगर, अकोला येथील रहिवासी असलेला ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १ रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात ९४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६०५४+३२४९+१७७=१९४८०*
*मयत-३८८*
*डिस्चार्ज-१४१०९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४९८३*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा