corona update: अकोला: आज दिवसभरात ४७६ पॉझिटिव्ह रुग्ण

             *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २७ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १५६७*
*पॉझिटीव्ह-२८८*
*निगेटीव्ह-१२७९*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)२४९+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ३९+ रॅपिड १८८=४७६

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५ महिला व २४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बाळापूर येथील १०, पळसखेड येथील सहा, मुर्तिजापूर येथील पाच, मंतरी बु. व पातूर येथील प्रत्येकी चार, नया अंदुरा येथील तीन, नंदापूर ता.मुर्तिजापूर येथील दोन, तर उर्वरित गायगाव, निंबा, खडकी, खानापूर ता.पातूर व अंभोरा ता.मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान आज सायंकाळी तिघांचे मृत्यू झाले. त्यात लहान उमरी, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष रुग्ण असून त्याना दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होत, तर अन्य अकोली जहागीर ता.मुर्तिजापूर येथील ७४ वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच जूने शहर, अकोला येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्णाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला त्याना दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३०, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, हारमोनी हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथून तीन, इंद्रा हॉस्पीटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून आठ, समाजकल्याण हॉस्टेल येथील २४, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील १३०, असे एकूण २२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२२०००+४६४७+१७७= २६८२४*
*मयत-४४३*
*डिस्चार्ज-१९७३५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६६४६* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या