corona update: आज दिवसभरात ३५३ नवे पॉझिटिव्ह; सायंकाळी आणखी १ रुग्ण मृत्युमुखी

            *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. १२ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- २६७७*
*पॉझिटीव्ह-३१८*
*निगेटीव्ह-२३५९*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)२५७+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ६१+ रॅपिड ३५=३५३



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ६१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ महिला व ४३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील केशव नगर येथील सात, खडकी येथील सहा, खेतान नगर येथील पाच, वर्धमान नगर येथील चार, मलकापूर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, जीएमसी, राऊतवाडी व मयुर कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पातूर, जूने शहर, न्यु तापडीया नगर, तापडीया नगर, सिव्हील लाईन, संत नगर, बायपास रोड, मोठी उमरी, रिंग रोड, डाबकी रोड, न्यु राधाकिसन प्लॉट, कुंभारी, निमवाडी, गंगा नगर, फिरदोस कॉलनी, बाजोरीया नगर, रतनलाल प्लॉट, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, जठारपेठ, देशमुख फैल, अकोट फैल, गणेश नगर, आयटीआय, संजीव नगर, माधव नगर व गजानन नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज सांयकाळी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बोरगाव वैराळे, बाळापूर येथील रहिवासी असलेला ७३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना दि. ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५०, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, नवजीवन हॉस्पीटल येथून सात, हॉटेल रिजेन्सी येथून चार, सहारा हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातून चार, बाईज हॉस्टेल अकोला येथून १५, हॉटेल स्कायलार्क येथून सात, तर होम आयसोलेशन येथील २०० जणांना असे एकूण २९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६९७३+३४३९+१७७=२०५८९*
*मयत-३९७*
*डिस्चार्ज-१५२९३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ४८९९*




(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या