corona update: Akola: आज एकूण २६७ पॉझिटिव्ह; २ मृत्यू

             *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. ९ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- २१५१* 
*पॉझिटीव्ह-१७३*
*निगेटीव्ह-१९७८*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)१५३+ आरटिपीसीआर(सायंकाळ) २०+ रॅपिड ९४=२६७



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी २० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड, अकोट फैल व कवर नगर येथील प्रत्येकी तीन, जीएमसी क्वॉटर व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाभुळगाव, घुसर, सिंधी कॅम्प, सांगवी बाजार, मलकापूर, तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज सांयकाळी एकाचा मृत्यू झाला. त्यात हिवरखेड, तेल्हारा येथील रहिवासी असलेला ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १० फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.


                                
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील नऊ, बिहाडे हॉस्पीटल येथील सात,  सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील ११, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, युनिक हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून ११, अवघाते हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून सहा, बॉईज हॉस्टेल अकोला येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातून चार, तर होम आयसोलेशन येथील ११० जणांना असे एकूण २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६०७४+३२४९+१७७=१९५००*
*मयत-३८९*
*डिस्चार्ज-१४३४२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४७६९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या