corona update: Akola: आज दिवसभरात एकूण ३९१ पॉझिटिव्ह रुग्ण

           *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. ६ मार्च २०२१ रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-१७४०*
*पॉझिटीव्ह-३३८*
*निगेटीव्ह-१४०२*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)२५१+ आरटिपीसीआर(सायंकाळ)८७+ रॅपिड ५३=३९१



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ८७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २२ महिला व ६५  पुरुषांचा समावेश आहे. त्यात पातूर येथील १९, लहान उमरी व मोठी उमरी येथील प्रत्येकी सात, रणपिसे नगर येथील सहा, कुरणखेड, जठारपेठ व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, पैलपाडा, जवाहर नगर, शास्त्री नगर, न्यु राधाकिसन प्लॉट व खडकी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित नेकलेस रोड, उत्तरा कॉलनी, गोरक्षण रोड, शिवसेना वसाहत, मलकापूर, सांगळूद, मुर्तिजापूर, वर्धमान नगर, सातव चौक, मुकूंद नगर, माधव नगर, सुधीर कॉलनी, भारती प्लॉट, जूने शहर, म्हैसांग, गजानन नगर, शिवणी, आदर्श कॉलनी, खोलेश्वर, न्यु तापडीया नगर, लक्ष्मी नगर,काटेपूर्णा, अन्वी मिर्झापूर, निपाणा, भारतीय हॉस्पीटल, डाबकी रोड, दिपक चौक, जीएमसी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४०, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील १२, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील आठ, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथून पाच, आर्युवेदिक रुग्णालय येथून १२, अवघाते हॉस्पीटल येथून आठ, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून तीन, नवजीवन हॉस्पीटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथील ९२ जणांना असे एकूण १९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१५५५४+३०४९+१७७=१८७८०*
*मयत-३८३*
*डिस्चार्ज-१३८६४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४५३३*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या