corona update: Akola: आज दिवसभरात ३४५ पॉझिटिव्ह रुग्ण

            *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. ११ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- २५१८*
*पॉझिटीव्ह-२७६*
*निगेटीव्ह-१९७८*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)२२७+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ४९+ रॅपिड ६९=३४५



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११ महिला व ३८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील नऊ, शिवणी येथील पाच, राम नगर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, शास्त्रीनगर, खोलेश्वर व जूने शहर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित गोकूल कॉलनी, जीएमसी, एसबीआय कॉलनी, अडगाव, केशव नगर, राजीव गांधी नगर, सिंधी कॅम्प, शिवसेना वसाहत, रामदासपेठ, टीएचओ ऑफीस, बक्षी हॉस्पीटल, रतनलाल चौक, मोठी उमरी, महान, रणपिसे नगर, मलकापूर, न्यु बैद्यपूरा, पोला चौक, मालीपूरा, देवरावबाबाची चाळ, अकोट फैल, रतनलाल प्लॉट व तेल्हारा  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज सांयकाळी खाजगी रुग्णालयातून दोघांचे मृत्यू झाले. त्यात गोरक्षण रोड येथील रहिवासी असलेला ४६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २६ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य पिंपलखुटा ता. बार्शिटाकळी  येथील रहिवासी असलेला ४४ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.


                                
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३०, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच,  आयकॉन हॉस्पीटल येथून सात, नवजीवन हॉस्पीटल येथून एक,कोवड केअर सेंटर समाज कल्याण हॉस्टेल येथून १५, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील ३२, सहारा हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातून १०, तर होम आयसोलेशन येथील २२५ जणांना असे एकूण ३३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६६५५+३४०४+१७७=२०२३६*
*मयत-३९३*
*डिस्चार्ज-१४९९४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ४८४९*




(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या