corona update: Akola: आज दिवसभरात एकूण ३६७ नवे पॉझिटिव्ह; सायंकाळी एकाचा मृत्यू

                *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. २२ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १५५१*
*पॉझिटीव्ह-३२५*
*निगेटीव्ह-१२२६*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) २७१+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ५४+ रॅपिड ४२=३६७

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ५४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २० महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  पिंजर येथील पाच, डाबकी रोड, खदान, तेल्हारा व जीएमसी येथील प्रत्येकी तीन, कौलखेड, संतोष नगर, सिंधी कॅम्प, पिंपळखुटा, निंबी, बार्शीटाकळी, गजानन नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मणात्री, हिंगणी, गोरक्षण रोड, खडकी, पंचशील नगर, कुरणखेड, बदलापूर, तारफैल, राऊतवाडी, वाडेगाव,  राम नगर, रामदासपेठ, चतारी, तापडीयानगर, उमरदरी, राधे नगर, अकोट फैल, रिधोरा, अनंत नगर, वानखडे नगर, गुलजारपुरा, भिरडवाडी, जुना कॉपड बाजार येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान आज सायंकाळी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मुर्तिजापूर येथील ७० वर्षीय  पुरुष असून या पुरुषास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५३, सहारा हॉस्पीटल येथील चार, अकोला ॲक्सीडेंट येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, युनिक हॉस्पीटल येथील चार, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी नऊ, इंद्रा हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल अकोला येथील एक, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, समाज कल्याण हॉस्टेल येथील सहा,  तर होम आयसोलेशन येथील ३०७ जणांना असे एकूण ४०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२०५५३+४०४६+१७७=२४७७६*
*मयत-४२७*
*डिस्चार्ज-१८१६६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६१८३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या