corona update: Akola: आज दिवसभरात ३३१ नवे रुग्ण; सायंकाळी २ मृत्यू

              *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. १९ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १४७०*
*पॉझिटीव्ह-२५८*
*निगेटीव्ह-१२१२*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) १९५+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ६३+ रॅपिड ७३=३३१



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ६३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ महिला व ४५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पिंपळखुटा येथील सहा, रामदासपेठ येथील पाच, म्हैसपूर येथील चार, मोठी उमरी येथील तीन, मलकापूर, शमशेरपूर, बापू नगर, सिद्धात नगर, पोपटखेड येथील प्रत्येकी दोन,  तर उर्वरित टाकळी खुर्द, सिंधीकॅम्प, केशव नगर, आदर्श कॉलनी, खदान, सुधीर कॉलनी, पावसाळे लेआऊट, जूने शहर, अकोट, गोरक्षण रोड, यमुना नगर, बिर्ला रेल्वे कॉलनी, सागर कॉलनी, जीएमसी, शास्त्री नगर, वैराट, प्रतिक नगर, सिंधी कॅम्प, खडकपूरा, जमकेश्वर, गौतम नगर, वरखेड, रैहम्यत नगर, मुर्तिजापूर, सिरसो, निमवाडी, चैतन्य नगर, डाबकी रोड, तारफैल, शंकर नगर, पंचशील नगर, न्यु भीम नगर, गुडधी, मजलापूर व पणज येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज सायंकाळी दोंघाचा मृत्यू झाला. त्यात बिर्ला कॉलनी, अकोला येथील ७० वर्षीय  पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण मोठी उमरी येथील ८८ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७९, सहारा हॉस्पीटल येथील एक, हेंडज कोविड केअर सेटर मुर्तिजापूर येथील एक, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, कोविड केअर सेटर तेल्हारा येथील १०,  बिहाडे हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील सहा, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील नऊ, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, आर्युवेदिक महाविद्यालयातून दोन, तर होम आयसोलेशन येथील १०५ जणांना असे एकूण २३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१९४१५+३८७४+१७७=२३४६६*
*मयत-४२१*
*डिस्चार्ज-१७५८३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५४६२*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या