- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: शहरातील अकोट फाइल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेल्वे कॉलनी येथे एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्येच्या घटना उघडकीस आल्याने नागरिक पुरते हादरले आहेत.
शहरातील अकोटफाईल परिसरातील रेल्वे कॉलनी येथे दुपारच्या सुमारास एका इसमाची हत्या झाल्याचे समोर आले. बंटी मंगवणे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून, त्याच्या छातीमध्ये चाकू मारून अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा