Lockdown:Day1: अकोलेकरांनी पेट्रोल पंपवर केली गर्दी,प्रशासनाने घेतली तात्काळ दखल




भारतीय अलंकार24

अकोला: जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या सहा दिवसाच्या लोकडाऊनचा आज पहिला दिवस होता. आज मात्र अकोल्यातील नागरिकांनी नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य केल्याचे दिसून आले. अकोट, अकोला आणि मुर्तीजापुर या तिन्ही शहरात आज सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची दुकान सुरू ठेवण्यात आली होती. तिन्ही शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यात हा कालावधी सकाळी 9 ते 5 पर्यंत आहे.



पेट्रोल पंपवर  गर्दी

आजच्या बंद दरम्यान सर्वात मोठी गर्दी पाहायला मिळाली ती म्हणजे पेट्रोल पंपावर. कारण शहरातील केवळ पाच पेट्रोल पंपांनाच पेट्रोल आणि डीझलची विक्रीची परवानगी देण्यात आली होती. पेट्रोलसाठी नागरिकांनी आज मोठी गर्दी केली होती. ही गर्दी पाहता उद्यापासून कंटेन्मेंट झोनमधील सर्व पेट्रोल पंप सकाळी 8 ते 3 उघडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.



हे पेट्रोल पंप रात्री 8 पर्यंत सुरू राहणार

मात्र आधी परवानगी देण्यात आलेल्या मे. वजीफदार अन्‍ड सन्‍स, वसंत देसाई स्‍टेडीयम जवळ अकोला, मे. एम.आर. वजीफदार अन्‍ड कं. आळशी प्‍लॉट अकोला, मे. केबीको अटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर अकोला, औद्योगीक विकास महामंडळ क्षेत्रामधील, मे. न्‍यु  अलंकार सर्वो, वाशिम बायपास अकोला या पाचही पेट्रोल पंपांवर डीझल आणि पेट्रोल विक्री रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. 



त्याच बरोबर औषधांची दुकाने सुद्धा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू ठेवण्यात येणार आहे. आधी औषधांच्या दुकानांना दुपारी 3 ची वेळ मर्यादित करण्यात आली होती.

टिप्पण्या