Crime news: अकोल्यात मोठी उमरीत राष्ट्रीय शाळेजवळ युवकाची हत्या



भारतीय अलंकार24

अकोला : स्थानिक सिव्हील लाईन पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोठी उमरी परिसरातील राष्ट्रीय शाळेजवळ एका २५ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. 



प्राथमिक तपासणीत मृतकाचे नाव हे गोपाल शिंदे असून हत्या कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप समोर आले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सिव्हील लाईन पोलीस टीम पोहोचली. युवकाचा मृतदेह शवविच्छेदन साठी रुग्णालयात पाठविण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे ठाणेदार मडावी, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होवून, परिसराची पाहणी केली. पंचनामा करून पुढील तपास हाती घेतला. गुन्हेगारांचा शोध घेण्यास तपास यंत्रणा सज्ज झाली आहे.



दरम्यान, घटना घडण्याआधी मृतक युवकाला त्याच्या मित्रांनी दुपारी राष्ट्रीय शाळेच्या मैदान परिसरात बोलावून घेतले होते. याठिकाणी युवकांचा वाद होवून, या वादातून हत्या झाली असल्याची घटनास्थळी चर्चा होती. 

टिप्पण्या