corona update: Akola: आज ५९ पॉझिटीव्ह

             *कोरोना अलर्ट*

आज मंगळवार दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,


*प्राप्त अहवाल-३१७*  
*पॉझिटीव्ह-५९*
*निगेटीव्ह-२५८*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३१७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ५९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २३ महिला व ३६ पुरुष रुग्ण आहेत.  त्यात मुर्तिजापूर आणि अकोट येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, मोठी उमरी, तोष्णीवाल ले आऊट येथील प्रत्येकी चार, बाभुळगाव, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन,  सहकार नगर, केडीया प्लॉट, हिवरखेड येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत राऊतवाडी, बार्शी टाकळी, कलाल ची चाळ, गुडधी, तापडीया नगर,  गोडबोले प्लॉट, न्यु तापडीया नगर, पातूर, जुने शहर, कैलास टेकडी, न्यु भागवत प्लॉट,  जवाहर नगर,  गंगानगर, सिव्हील लाईन, गीता नगर, बोरगाव मंजू, जीएमसी, निंबोरा, ओम सोसायटी येथील प्रत्येकी  एक या प्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान आज दोन रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.  त्यात कापशी येथील एका ६७ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. या महिलेस  दि.१ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक सुकळी ता. बार्शी टाकळी येथील  ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या रुग्णास दि.६ रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९६६१+२०८३+१७७=११९२१*
*मयत-३४०*
*डिस्चार्ज-१०७१४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-८६७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या