corona update: Akola: आज १६५ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*


*आज सोमवार दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ५०३*  
*पॉझिटीव्ह-१६५*
*निगेटीव्ह-३३८*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५१ महिला व ११४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील २८, अकोट येथील २०, जीएमसी व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कान्हेरी सरप व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, देवरावबाबा चाळ, कौलखेड, खडकी, मोठी उमरी, डाबकी रोड व उगवा येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, रामदास पेठ, न्यु तापडीया नगर, सुधीर कॉलनी व गिता नगर येथील प्रत्येकी तीन, तापडीया नगर, मलकापूर, केशव नगर, सिंधी कॅम्प, अमृतवाडी,दगडी पूल, बलोदे लेआऊट, गजानन पेठ, मराठा नगर, बाजोरीया नगर व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित उरळ, एपीएमसी मार्केट, गोकूल कॉलनी, रवी नगर, विद्या नगर, जूने शहर, निबंधे प्लॉट, गंगाधर प्लॉट, चांदुर, तोष्णीवाल लेआऊट, सातव चौक, शिवाजी नगर, गड्डम प्लॉट, व्दारका नगर, खोलेश्वर, गजानन नगर, अजिक्य नगर, अकोट फैल, खदान नाका, राऊतवाडी, लहरीया नगर, मलकापूर, गंगा नगर, रजपूतपुरा, निमवाडी, सिंधीखेड ता. बार्शीटाकळी, माना ता.मुर्तिजापूर, कृष्ण नगरी, पैलपाडा बोरगाव मंजू व माणिक टॉकीज येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ३१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-११५८८+२३६६+१७७=१४१३१*
*मयत-३५३*
*डिस्चार्ज-११५८५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२१९३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या