BJP: Sanjay Dhotre: लोकनेते संजयभाऊ धोत्रे यांचा वाढदिवस 'सामाजिक दायित्व दिवस' म्हणून साजरा होणार

                     लोकनेते संजयभाऊ धोत्रे



लहानपणापासून आपल्या आई-बाबाच्या संस्कारातून बाळकडू घेणारे. सामाजिक दायित्व वारसा घेऊन, शैक्षणिक जीवनापासून कार्यरत केंद्रीय राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे  शुक्रवार, २६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ६३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. 



राजकीय जीवनाला प्रारंभ


माजी आमदार स्वर्गीय शामरावजी धोत्रे यांचा सामाजिक पगडा असलेले केंद्रीय राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे यांनी विद्यार्थी दशेपासून समाजकारण व राजकारण याची सुरुवात केली. वडिलांचा सहकार आणि काँग्रेसशी संबंध असला तरी, संजयभाऊ धोत्रे यांच्यावर आपले मित्र इंजिनिअरिंग कॉलेज आणि विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या मित्रासोबत बैठक असल्यामुळे त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली.  येथून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला  अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष पासून सुरुवात केली. 




भाऊसाहेब फुंडकर यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य


ज्या पक्षात आपण राहतो त्या पक्षाचा विस्तार त्याची विचारसरणी त्याचे आचरण जीवनामध्ये  अंगीकार करून संजयभाऊ धोत्रे यांनी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, स्वर्गीय वसंतराव देशमुख, स्वर्गीय मोतीरामजी लहाने यांच्यासोबत पक्षाच्या विस्तारासाठी जिल्ह्यात कार्य सुरू केले. पक्षाने दिलेली जबाबदारी सरचिटणीसपद, उपाध्यक्षपद ,अध्यक्षपदची जबाबदारीशी एकरूप होऊन पक्षाला घवघवीत यश प्राप्त करून देण्यात भाऊसाहेब फुंडकर यांच्या खांद्याला खांदा लावून शतप्रतिशत  भाजपा अकोला जिल्ह्यात करण्यात सिंहाचा वाटा आहे. ज्येष्ठांचा सन्मान, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे, युवाशक्ती, मातृशक्तीला योग्य वागणूक, संघटन कौशल्य सोबत स्पष्टवादी या गुण कौशल्याने व्यापारी, उद्योजक, शेतकरी, शेतमजूर, गावकरी यांच्यात स्वतःचे वेगळे आणि आपुलकीचे स्थान निर्माण करण्यात संजयभाऊ धोत्रे यशस्वी ठरले. 




चार वेळा नेत्रदीपक यश


मूर्तिजापूर विधानसभा मध्ये त्यांनी यश प्राप्त केले. भाऊसाहेब फुंडकर यांनी त्यांना आपल्या राजकीय वारस देऊन अकोला जिल्ह्यात अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजप आणि प्रदान केली चार वेळा या लोकसभा मतदारसंघातून सातत्याने नेत्रदीपक विजय प्राप्त करून संजयभाऊ धोत्रे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सहकार, व्यापार, शेतकरी, इंजिनियर व सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा जाणारा लोकनेता म्हणून त्यांनी मान्यता प्राप्त केली. सामाजिक दायित्व लक्षात घेऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात सोबत सातत्याने सोबत उभा राहण्याची त्यांची कला मानसिकता हे गुण त्यांनी आपले वडील शामराव धोत्रे व आई यांच्या संस्कारातून घेतले. सातत्याने अकोला जिल्ह्यात जात पात धर्म पक्ष सोडून कार्यरत राहण्याच्या त्यांच्या शैलीने अजात शत्रू म्हणून त्यांनी जिल्ह्यात आपली अमीट छाप निर्माण केली. पक्षाने त्यांना सचिव उपाध्यक्षपद देऊन त्यांचा गौरव केला. 





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी

प्रदेश स्तरावर काम केल्यानंतर पक्षाने केंद्रस्तरावर काम करण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी संजयभाऊ धोत्रे यांच्या कार्यशैलीचा उपयोग व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी दिली. शैक्षणिक सोबत तंत्रज्ञानाचा उपयोग देशाला व्हावा, यासाठी रमेश पोखरियाल निशंक व रविशंकर प्रसाद सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. वेगवेगळ्या योजना,   covid-19  काळात त्यांच्या मंत्रालयाने कामगार, शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी व सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले. आरोग्य क्षेत्रात आरोग्य सेतूने  महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 




covid-19 मध्ये सामाजिक दायित्व म्हणून अकोला जिल्ह्यांमध्ये त्यांनी केलेले भरीव काम. त्यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हा भाजपा केलेले काम. त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सूचना व काम करण्याची पद्धत प्रत्येक काम नजरेखाली करून घेऊन जिल्हा प्रशासनाचे राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शैक्षणिक सोबत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दृष्टीने भारत  प्रत्येक क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होत असून, भारतीय स्वरूपातील व्हाट्सअप फेसबुक करण्याच्या दृष्टीने भारत सरकार व त्यांचे मंत्रालय कार्यरत आहे. 




सामाजिक दायित्व दिवस

अकोला जिल्ह्यात कोणत्याही चांगल्या कामाला प्रखरपणे समर्थन देणारे. विरोधासाठी विरोध नव्हे तर तत्त्वांना विरोध करणारे. सकारात्मक राजकारण करणारे. समाजसेवेचा वसा घेऊन पारदर्शक कारभाराला चालना देणारे. अकोला जिल्ह्यात मतदारांना दिलेल्या शब्दांना पूर्ण तयार करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणारे. स्पष्टपणे सामाजिक दायित्वचे पालन करणारे. लोकनेते शेतकऱ्यांचे नेते व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी  संवेदनशील असणारे संजयभाऊ धोत्रे यांचा वाढदिवस covid-19 च्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक दायित्व दिवस म्हणून साजरा करणार आहेत. या निमित्ताने रक्तदान व सामाजिक उपक्रम सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करून आणि संजयभाऊ धोत्रे यांना अपेक्षित कार्य व त्यांच्या कार्याला समर्पित सलाम करण्याच्या दृष्टीने २६ रोजी ठीकठिकाणी रक्तदान हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 



विजयी संकल्प

भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष असून, संजूभाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा भाजपाचा विजय होणार हा संकल्प घेऊन सामाजिक दायित्व म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी केलेला उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले. ही त्यांचे लोकप्रियतेची व त्यांच्या कामाची पावती आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सदैव सक्रिय भाग घेणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती सुहासिनी ताई (वहिनी) धोत्रे यांचा त्यांच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. ही जोडी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन, सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये मार्गदर्शक ठरेल, एवढे मात्र निश्चित. 




                                   लेखन

                                गिरीश जोशी, 

                          जिल्हा प्रसिद्धीप्रमुख 

                               अकोला भाजपा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा