- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola Lockdown: अकोला, मुर्तिजापूर व अकोट शहरात ८ मार्च पर्यंत lockdown वाढविला; जिल्हाधिकारी यांनी काढला नवा आदेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार24
अकोला : कोरोनाचा उद्रेक पाहता अकोला जिल्ह्यातील अकोला शहर ,मूर्तिजापूर शहर व अकोट शहर येथे लॉकडाऊन १ मार्च पर्यंत जाहीर केला होता. अजूनही परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज नवा आदेश काढून, lockdown ८ मार्च पर्यंत राहणार असल्याचे सांगितले आहे.
तिन्ही शहरांमध्ये मंगळवार २३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत लॉकडाऊन लागू केल्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवार २१ फेब्रुवारी रोजी केली होती. आता मात्र,lockdown ८ मार्च पर्यंत वाढविण्यात आला आहे. पूर्वीच्या आदेशात दिलेले व नंतर परिस्थिती पाहून बदलवलेले निर्देश नव्या आदेशात कायम ठेवले आहेत
तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने, धान्य विक्री, पेट्रोल पंप , मेडिकल आणि तसेच वैद्यकीय सेवेशी निगडित प्रतिष्ठाने ही उघडी राहणार असून त्या सोबतच परीक्षार्थी विद्यार्थी यांना ठराविक नियमावली जाहीर करून सूट दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा