Akola crime: बापू नगरात दोन गटात हाणामारी; पाच गंभीर जखमी

  



अकोला : शहरात कोरोना संचारबंदी असतानाही अकोट फाइल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बापूनगर येथे रविवारी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत पाच गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


शहरातील अकोट फाइल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बापूनगरात आपसी वादातून दोन गटांमध्ये मारामारी करण्यात आली. सुरवातीला बाचाबाची झाली. थोड्याच वेळात प्रकरण हाणामारी पर्यंत आले. दोन्ही गटाकडून जोरदार प्रहार झाले.यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


गंभीर जखमीमध्ये प्रदीप, राजू, संजू, एक महिला व एक अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अकोटफाईल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात पाठविले.

टिप्पण्या