- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार24
वाशिम : ड्रिमलँड सिटी मधील रहिवासी प्रख्यात ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक तथा माजी मुख्याध्यापक रमाकांत नागलिंगस्वामी कपाले ( गुरुजी ) यांचे गुरुवार २१ जानेवारी रोजी रात्री उशीरा हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षाचे होते. येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय कपाले यांचे ते वडील होत.
पद्मतीर्थ मोक्षधामावर शुक्रवार २२ जानेवारी रोजी दुपारी त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सामाजिक , धार्मिक, राजकीय, शिक्षण, सांस्कृतिक, पत्रकारीता तथा वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, जावाई, स्नुषा, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. कपाले गुरुजीच्या निधनाने ज्योतिषशास्त्र क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा