Spirituality: Akola: संतश्री गजानन महाराज पादुका संस्थान: मुंडगाव यात्रा महोत्सव रद्द ; सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबविणार

Spirituality: Gajanan Maharaj Paduka Institute: Mundgaon Yatra Festival canceled;  Various social activities will be implemented during the week (File Photo)




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोना विषाणू महामारीच्या सावटात अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे दरवर्षी होणारा भव्य मुंडगाव यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र, हा सप्ताह विविध सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव विश्वस्त मंडळाने दिली आहे.



संत श्री गजानन महाराजांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या यात्रा महोत्सवामध्ये खंड पडू नये, यासाठी श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव विश्वस्त मंडळ तसेच मोजक्या सेवाधारींच्या उपस्थितीत उद्या गुरुवार २१ जानेवारी रोजी यात्रा सप्ताह प्रारंभ होणार आहे. तसेच दैनंदिन कार्यक्रम रोज सकाळी ५ ते ६ काकडा सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ होणार आहे.


असा साजरा होईल सप्ताह

                                      File photo

गुरुवार २१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता भक्त निवासाचे भूमिपूजन श्री झामसिंग महाराज संकुल मध्ये होईल. तसेच डॉ. निखील धांडे (हृदय रोग तज्ञ, मधुमेह रोग तज्ञ अकोट) यांच्या द्वारा तपासणी व रोगनिदान शिबीर दुपारी २ ते ५ पर्यंत आहे.



रविवार  २४ जानेवारी रोजी डॉ. पार्थ  गवात्रे (अस्थी रोग तज्ञ) आणि प्रिया चिमा गवात्रे (स्त्री रोग तज्ञ  अकोला) यांच्या द्वारा तपासणी व आरोग्य शिबीर सकाळी ११ ते ४ पर्यंत राहणार आहे. 



सोमवार २५ जानेवारी रोजी जवान शिवाभाऊ भालेराव यांच्या वाढदिवसा निमित्त शिवा भालेराव मित्र परिवारा तर्फे भव्य रक्तदान शिबिर वेळ सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत स्थळ सोपिनाथ महाराज संस्थान मुंडगाव आहे.



श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावच्या यात्रेची सुरवात २१ जानेवारी  गुरुवार पासून होणार आहे. त्याच दिवशी निबंध स्पर्धा शुभारंभ होणार आहे. निबंध स्पर्धा मधील विषय- संत नगरी मुंडगावची पौराणिक कथा, इतिहास, संतांचे चरित्र, व्यक्ती विशेष, महत्वपूर्ण घटना, गावाची विशेषतः मुंडगावच्या सर्व जाती धर्माच्या चालीरीती,रूढी,परंपरा,संस्कृति.यावर निबंध स्पर्धा आहे.

 


गुरुवार २८ जानेवारी पौष पोर्णिमेला सप्ताहाची सांगता होणार आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे यात्रेतील महाप्रसाद, दिंडी मिरवणूक व दहीहांडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळ, सल्लागार समिती व गावकरी मंडळीने घेतला आहे.




टिप्पण्या